किनगावच्या शेतकर्याचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू
A farmer of Kingaon died after drowning in a well यावल : तालुक्यातील किनगाव येथील 39 वर्षीय शेतकर्याचा विहिरीत तोल जावून पडल्याने मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.लिलाधर रतीलाल काटे-धनगर (39) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
विहिरीत आढळला मृतदेह
लिलाधर काटे हे शेतकरी आपल्या गुरा-ढोरांना चारा आणण्याकरीता शनिवारी शेत-शिवारात गेले मात्र घरी न आल्याने त्यांचा शोध सुरू होता तर यावल पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह किनगाव शेत-शिवारातील सुरेश पंढरीनाथ देवरे यांच्या शेत विहिरीत आढळलला. विहिरीजवळ चारा काढत असतांना तोल जाऊन ते विहिरीत पडल्याचा अंदाज आहे. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.जिशान खान यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदर नरेंद्र बागुले करीत आहे. मयत लिलाधर काटे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परीवार आहे.

