भुसावळात आज ‘एक शाम देश के नाम’ देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम
भुसावळ : ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशन, भुसावळ पोलीस दल, रोटरी क्लब रेलसिटी, मातृभूमी मंडळ, श्री रीदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, महादेव डिस्ट्रीब्युटर आदींच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, 23 रोजी सायंकाळी ‘एक शाम देश के नाम’ या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन शहरातील म्युन्सीपल हायस्कूल, जामनेर रोड येथे सायंकाळी सहा वाजता करण्यात आले आहे.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, डॉ.शंतनू कुमार साहू, नगरसेवक किरण कोलते, पंकज महादेव, रोटरीचे मकरंद चानवड, ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनचे अध्यक्ष मोहन तायडे, जिल्हा सचिव व कलावंत, पत्रकार तुषार वाघुळदे, दीपक नाटेकर, पंकज तिप्लाणी, प्रवीण ओहोळ आदींची विशेष उपस्थिती राहणार आहे.

रसिक-श्रोत्यांनी या देशभक्तीपर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भुसावळ तालुका ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक नाटेकर आणि पदाधिकार्यांनी कळविले आहे.
