भुसावळच्या विवाहितेला जळगावात कंटेनरने चिरडले


पती गंभीर जखमी : अपघातानंतर कंटेनर चालक पसार

जळगाव : डायबीटीसच्या आजारासाठी जळगावात आलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला कंटेनरने धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. बुधधवारी सकाळी नऊ वाजता दूरदर्शन टॉवरजवळ हा अपघात झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भुसावळच्या नजमाबी शेखचांद पिंजारी (52) या पती उस्मान पिंजारी (60, रा. भुसावळ) हे दाम्पत्य आजाराच्या निदानासाठी जळगावात दुचाकी (क्रमांक एमएच 19 सीसी 7179) ने े येत असताना राष्ट्रीय महामार्गावरील दूरदर्शन टॉवर समोर मागून येणार्‍या कंटेनर (क्रमांक एच.आर. 56 ए.8549) ने जोरदार धडक दिल्याने नजमाबी ह्या कंटेनरच्या मागच्या चाकात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू ओढवला तर शेख चाँद उस्मान पिंजारी हे गंभीर जखमी आहेत. मृत नजमाबी यांच्या पश्चात सहा मुली आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !