Two-wheeler Lampas from Nageshwar temple area in Warangaon वरणगावातील नागेश्वर मंदिर परीसरातून दुचाकी लंपास
Two-wheeler Lampas from Nageshwar temple area in Warangaon वरणगाव : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री नागेश्वर महादेव मंदिर परीसरातून भाविकाची दुचाकी लंपास करण्यात आली.
वरणगाव पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा
तळवेल येथील प्रशांत तुकाराम पाटील (53) हे त्यांचे सासरे शांताराम काळे (लिहा, ता. मोताळा) यांची दुचाकी (एम.एच.28 जी. 8598) द्वारे सोमवारी दर्शनासाठी आले असता त्यांची दुचाकी लंपास करण्यात आली. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार आडसूळ करीत आहे.

