धुळे महानगरपालिकेचा लाचखोर लिपिकाची कोठडीत रवानगी


धुळे : वाढीव बांधकामाची सुधारीत घरपट्टी मिळवून देण्याच्या मोबदल्यात दोन हजार आठशे रुपयांची लाच मागणार्‍या धुळे महानगरपालिकेचा लाचखोर लिपिक जितेंद्र वसंत जोशी (47) यास बुधवारी दुपारी धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. आरोपीला गुरुवारी धुळे न्यायालयात हजर केले असता त्यास एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. धुळ्यातील 45 वर्षीय तक्रारदाराकडे आरोपीने 16 रोजी वाढीव घरपट्टी कमी करण्यासाठी लाच मागितल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली होती. बुधवारी आरोपीने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई धुळे एसीबीचे उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, नाईक संदीप सरग, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, कॉन्स्टेबील प्रशांत चौधरी, भूषण खलानेकर, भूषण शेट्टे आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !