ईटारसी-भुसावळ पॅसेंजरखाली आल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू
रावेर : अप 51158 ईटारसी-भुसावळ पॅसेंजरखाली आल्याने अनोळखी 35 ते 40 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास निंभोरा रेल्वे स्थानकाजवळ घडली. समजलेल्या माहितीनुसार, ईटारसीकडून निघालेली पॅसेंजर निंभोरा रेल्वे स्थानकाजवळ आल्यानंतर निंभोरा रेल्वे गेट येण्यापूर्वी अज्ञात इसम पॅसेंजरखाली आल्याने त्याचा मृत्यू ओढवला. इंजिनाच्या दर्शनी भागात अज्ञाताचा मृतदेह लटकला असल्याची माहिती रेल्वे गेटमनने निंभोरा स्टेशन मास्तरला दिल्यानंतर निंभोरा रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर रेल्वे लोकोपायलटला माहिती दिल्यानंतर मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढल्यानंतर लोहमार्ग पोलिसांना माहिती कळवण्यात आली. दहा मिनिटांच्या विलंबाने गाडी भुसावळकडे मार्गस्थ झाली. सायंकाळी उशिरापर्यंत अनोळखीची ओळख पटलेली नव्हती. अनोळखी इसमामे आत्महत्या केली ? की अन्य कारणाने त्याचा मृत्यू झाला? याबाबत लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू आहे. तपास लोहमार्गचे त्र्यंबक वाघ व नरेंद्र लोंढे करीत आहेत.
