शालिमार एक्सप्रेसमधून पडल्याने अनोळखीचा मृत्यू


भुसावळ : 18030 अप शालिमार एक्सप्रेसमध्ये पडून दोन्ही पाय कापले गेलेल्या अनोळखी व्यक्तीचा जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी मृत्यू झाला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उंची पाच फुट पाच इंच, रंग गोरा, शरीर बांधा सडपातळ, चेहरा लांबट, नाक सरळ अंगात लायनींगचे शर्ट, काळी पॅन्ट असे मृत व्यक्तीचे वर्णन आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन तपासी अंमलदार एएसआय आर.एस.उपाध्याय यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !