जळगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सांगली जिल्ह्यात मोफत आरोग्य सेवा


जळगाव : राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगावतर्फे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील व टीम कोल्हापूर-सांगली पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चार डॉक्टरांच्या टीमसह औषधी तसेच इतर गरजेचे साहित्य घेऊन सांगलीत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याशी चर्चा करून ज्या-ज्या भागात जास्त नुकसान झाले आहे त्या ठिकाणी ही मदत पोचवली जाईल, अशी व्यवस्था करण्यात येत आहे.

एक वर्षांचे मानधन पूरग्रस्तांसाठी
जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून रवींद्र पाटील यांनी आधीच आपल्या जि.प.सदस्यत्वाचे एक वर्षाचे संपूर्ण मानधन पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून जाहीर केलेले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव सांगली-कोल्हापूरकरांसोबत नेहमीच सोबत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव यांच्यातर्फे कोल्हापूर सांगलीसाठी मदत घेऊन दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत डॉक्टर्स व औषधीदेखील घेऊन गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने इस्लामपूर भागातील तालुका वाळवा, जिल्हा सांगली या भागातील साटपेवाडी, गौंडवाडी, बनेवाडी, मसुचिवाडी, फार्णेवाडी या सर्व गावामध्ये मोफत आरोग्य सेवा व औषधी देऊन आरोग्य सेवा देण्यात आली.

यांची टीम बजावतेय सेवा
राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील सोबत भडगावचे डॉ.हेमंत देवीदास पाटील, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पाटील, दिनेश पाटील आदी युवक मंडळी सेवा बजावत आहे.


कॉपी करू नका.