रक्तदान जगात सर्व श्रेष्ठ दान -डॉ.प्रवीण चौधरी
समृद्धी हॉस्पिटल व एचडीएफसीच्या संयुक्त विद्यमाने शिबिर
रावेर : रक्तदान हे जगात सर्व श्रेष्ठ दान असून आपण केलेले रक्त दान दुसर्याला जीवनदान देण्याचे काम करत असते. रक्त दानामुळे शरीर निरोगी राहते, रक्त हे एकमेव चांगल्या कामात उपयोगी पडणारे दान असून जास्तीत-जास्त संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन शहरातील समृद्धी हॉस्पिटलचे डॉ.प्रवीण चौधरी यांनी केले. शुक्रवार, 6 डिसेंबर रोजी समद्धिी हॉस्पिटल परीवार व एच.डी.एफ.सी.बँकेच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी जळगाव येथील गोदावरी ब्लड बँकेच्या डॉ.नितीन भारंबे, सय्यद शेख, लक्ष्मण पाटील यांनी सहकार्य केले. 35 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. शिबिरासाठी डॉ.चैताली चौधरी, नरेंद्र परदेशी, मुकुंद तावडे, श्रीपाद जोशी, गणेश पाटील, कैलास पाटील, शिवम महाजन, राहुल तेली, नामदेव शिंदे, अविनाश दिवेकर, किरण पाटील, कल्पेश तरल, असलम शेख, चंद्रकांत महाजन, ललित चौधरी यांनी परीश्रम घेतले. शिबिराला सहकार्य करणार्यांचे आभार बँक व्यवस्थापक नरेंद्र परदेशी यांनी मानले.

