Mobile thief in Jalgaon caught by police गच्चीवरून प्रवेश करीत लांबवला मोबाईल : घर मालकाला जाग येताच आरोपी अडकला जाळ्यात


Mobile thief in Jalgaon caught by police जळगाव : घर मालक झोपल्याची संधी साधून गच्चीद्वारे घरात शिरलेल्या चोरट्याच्या मनसुब्यावर मात्र घर मालकाची झोप उघडल्याने पाणी फिरले तर आरोपीला पकडण्यात यंत्रणेला यश आले. ओंकार योगेश सोनवणे (20, रा.शनिपेठ, जळगाव) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. ही घटना सोमवार, 6 सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास शनिपेठेतील मरीमाता मंदिर परीसरात घडली.

जाग येताच अडकला चोरटा जाळ्यात
शहरातील शनिपेठेतील मरीमाता मंदिराजवळ श्रीकांत अरुण पाटील (24) हा तरुण वास्तव्यास आहे. सोमवार, 6 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ते झोपलेले असतांना त्यांच्या घराजवळील ओंकार सोनवणे हा गच्चीवरुन त्यांच्या घरात शिरला. दरम्यान, घरातील मोबाईल चोरुन नेत असतांना अचानक श्रीकांत पाटील यांना जाग आल्याने त्यांनी ओंकार सोनवणेला पकडून ठेवत आरोळ्या मारल्या.

पोलिसांना केले पाचारण
यावेळी घरातील सर्वजण जागे झाले. त्यांनी डायल 112 क्रमांकावर कॉल करीत घटनेची माहिती दिली. रात्री गस्तीवर असलेले शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी राहूल पाटील व अनिल कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन चोरटा ओंकार सोनवणे याला ताब्यात घेतले. याप्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक परीष जाधव करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !