हरवलेल्या पाकिटातील एटीएमद्वारे 25 हजार काढून फसवणूक


25,000 fraud through ATM withdrawal from lost wallet जळगाव : चाळीसगावातील तरुणीचे जळगावात पाकिट हरवल्यानंतर त्यातील एटीएमद्वारे भामट्याने 25 हजार रुपये काढून फसवणूक केली. या प्रकरणी मंगळवारी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

हरवलेल्या पाकिटातून एटीएम काढून रक्कम केली विड्राल
चाळीसगावातील दीपाली भिकन चौधरी ही तरुणी शिक्षण घेते. ती शहरातील टागोर नगरात वास्तव्यास आहे. शिक्षणासोबत पार्टटाईम वकीलांकडे जॉब करते. 31 जुलै रोजी तरूणी तहसील कार्यालयाकडे गेली असता काम आटोपून शिवाजी नगराकडे जात असतांना तिचे पाकीट कुठेतरी पडले. त्यात एटीएम कार्ड होते आणि त्यावर एटीएमचा पासवर्डदेखील लिहिलेली होता. हे पाकिट अज्ञाताला सापडल्यानंतर त्याने 25 हजार 500 रुपयांची रोकड काढली व तरुणीच्या मोबाईलवर तसा मेसेजदेखील आला. तरूणीने तातडीने शहर पोलिसात धाव घेत लेखी तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी दखल घेतली नाही. महिनाभरानंतर वरीष्ठांच्या सूचनेवरुन मंगळवार, 6 सप्टेंबर रोजी दुपारी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !