A young woman’s two-wheeler limpas from Jalgaon विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक तरुणीची दुचाकी लांबवली
A young woman’s two-wheeler limpas from Jalgaon जळगाव : नेहरू चौकातून गणेश भक्ताची दुचाकी चोरीला गेली. या प्रकरणी बुधवार, 7 सप्टेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील गणेशोत्सवात गणरायाच्या दर्शनासाठी तरुण दुचाकीने आल्यानंतर दुचाकीची चोरी झाली.
दुचाकी चोरीचे सत्र कायम
सोनाली सागरमल सोमानी (दादावाडी, ता.जळगाव) ही तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शहरात गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मंगळवार, 6 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता दुचाकी (एम.एच.19 सी.के.7119) ने मित्रांसोबत गणपती पाहण्यासाठी आली असता दुचाकी नेहरू चौकातील बिगबाजारच्या रस्त्यावर पार्किंग केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरीची संधी साधली. रात्री 10.30 वाजेता घरी जाण्यासाठी सोनाली सोमानी ह्या दुचाकीजवळ आल्या असता त्यांना दुचाकी आढळून आली नाही. बिगबाजार परीसरात त्यांनी व त्यांच्या मित्रांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतू दुचाकी मिळून आली नाही. बुधवार, सप्टेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार देण्यात आली.

