किन्ही शिवारात गावठी दारू उद्ध्वस्त


भुसावळ  : तालुक्यातील किन्ही शिवारातील नाल्याजवळ तालुका पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकत दारू तयार करण्याचे कच्चे रसायन जागेवरच नष्ट करीत 59 हजार रूपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, हवालदार विठ्ठल फुसे, रीयाज काझी, शिवाजी खंडारे यांनी रात्री अंधारात नाल्या काठ्याने सुमारे पाच किलोमीटर अंतर पायी जात नाल्याच्या काठावर सुरू असलेली दारू तयार करीत असलेली भट्टी जागेवरच नष्ट केली. यावेळी तेथे असलेले नऊ ड्रममधील एक हजार 800 लिटर नवसागर, महू, गुळमिश्रीत कच्चे रसायन, 60 लिटर तयार देशी दारू असे सुमारे 59 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात पोलिसांनी रशीद रन्नु गवळी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

कुर्‍हा येथे देशी दारूच्या बाटल्या जप्त
जामनेर रोडवरील कुर्‍हे पानाचे येथे अनिल पारधी यांच्याकडे देशी दारूच्या बाटल्या असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाल्याने त्यांनी पोलिस पथक पाठवून खात्री केली असता पारधी यांच्याकडे देशी दारूच्या 36 बाटल्या पोलिसांना मिळून आल्यात. सुमारे एक हजार 800 रूपये किंमतीच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहे. पारधी यांच्या विरूध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !