A pensioner in Jalgaon was given a sum of nine lakhs सेवानिवृत्तांनो सावधान ! : अनोळखी लिंकला क्लीक करू नका, बँकेचा तपशील देवू नका अन्यथा तुमचेेही बँक खाते असे होईल रीकामे
A pensioner in Jalgaon was given a sum of nine lakhs जळगाव : जळगाव शहरातील कोल्हेनगरातील सेवानिवृत्त वृद्धाला भामट्यांनी बँक खाते बंद पडण्याची भीती घालवून तब्बल नऊ लाख 19 हजार 995 रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी गुरुवार, 8 सप्टेंबर रोजी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
खाते बंद पडण्याची दाखवली भीती
शहरातील कोल्हे नगर परीसरात सुभाष राजाराम पाटील (61) हे परीवारासह वास्तव्यास असून ते सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. 6 सप्टेंबर रोजी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने सुभाष पाटील यांना खोटा व बनावट संदेश मोबाईलवर पाठवला. नंतर 8768251469 या मोबाईल नंबरवरून त्यांना फोन करत तुमचे बँकेचे खाते बंद पडेल, अशी भीती दाखवली. यानंतर खाते चालु ठेवण्यासाठी मोबाईलवर पाठवलेल्या संदेशात असलेल्या लिंकवर क्लीक करण्यास सांगितले. त्यात आधारकार्ड व पॅनकार्डची माहिती भरण्यास सांगितले. माहिती भरताच सुभाष पाटील यांच्या मोबाईलवर ओटीपी आला.

ओटीपी विचारून लांबवली रक्कम
तो संबंधिताचे विचारून सुभाष पाटील यांच्या बँक खात्यातून तब्बल 9 लाख 19 हजार 995 रुपये ऑनलाईन परस्पर काढून घेतले. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात 8768251469 आणि अन्य अज्ञात मोबाईल धारकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.
