भुसावळात 455 विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा


भुसावळसह मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील 16 विद्यार्थी गैरहजर

भुसावळ : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) अंतर्गत होणारी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीची परीक्षा रविवारी शहरातील बियाणी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. या पाीक्षेत भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील 471 विद्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी 455 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 16 विद्यार्थी गैरहजर राहिले.

तीन तालुक्यासाठी भुसावळ केंद्र
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी योजनेतून शिष्यवृत्ती मिळावी यासाठी दिली जाते. यासाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) तून इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याची परीक्षा घेतली जाते. विभागातील भुसावळ, मुक्ताईनगर व बोदवड या तीन तालुक्यातील प्रविष्ठ विद्यार्थ्यांची परीक्षा रविवारी शहरातील बियाणी इंग्लिश मेडीयम स्कूलच्या परिक्षा केंद्रावर घेण्यात आली. पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र होते. या परीक्षेसाठी इयत्ता सातवीमध्ये विद्यार्थ्याला किमान 55 टक्के गुण मिळालेले असणे आवश्यक होते. या परीक्षेत बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी अशा दोन विषयांच्या पेपर घेण्यात आला. रविवारी विद्यार्थ्यांनी दिलेले दोन्ही पेपर 90 गुणांसाठी होते, उत्तीर्ण होण्यासाठी 40 टक्के मिळणे आवश्यक असते तर एससी, एसटी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 32 टक्के असा निकष आहे, अशी माहिती केंद्र संचालक ए. एम. बावस्कर यांनी दिली. जिल्हा परीषदेचे केंद्र प्रमुख बी.डी.बोदडे, निलीमी झांबरे आदींनी सहकार्य केले.

परीक्षेत दोन पेपर
सकाळी साडेदहा ते 12 या वेळेत पहिल्या पेपरमध्ये मानसशास्त्रीय चाचणीमध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन आदी संकल्पनांवर तर दुपारी दीड ते तीन वाजेच्या दरम्यान झालेल्या दुसर्‍या पेपर हा अभ्यासक्रमावर आधारीत पेपर घेण्यात आला. त्यामध्ये सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, इतिहासचा समावेश होता.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !