हरताळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न
आमदार चंद्रकांत पाटील यांची ग्वाही : अधिकार्यांसोबत चर्चा
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहराच्या कुशीत तापी पूर्णा ह्या दोन पश्चिम वाहिनी नद्यांच्या संगमाचे पात्र आहे. या नद्यांवर असलेल्या हतनूर धरणात अपेक्षित पाणी साठा नसल्याने अर्ध्या जिल्ह्याची पाण्याची गरज भागवणार्या या शहरात व शेजारच्या बोदवड तालुक्यात कधी कधी दिड, दोन महिने नळाला पाणी न येणे हे या तालुक्याच्या पाचवीला पुजल्याच्या परीस्थिती दरवर्षी असते. हे चित्र कायमचे बदलविण्यासाठी मुक्ताईनगर बोदवड तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहात अधिकार्यांसह प्रदीर्घ चर्चा करून नवीन पाईपलाईन टाकण्याची गती वाढविण्याच्या सुचना संबंधित विभागाच्या अधिकार्यांना दिल्या.
हरताळ्याचा पाणीप्रश्न सुटणार
यावेळी आमदार पाटील यांनी बोदवड तालुक्याततील एका खेड्याचा आणि मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा या गावाचा ही या योजनेत समावेश करण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीसाठी पूर्णपणे सहकार्य व निधीच्या तरतुदीची कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले. आमदार पाटील यांच्या या प्रयत्नामुळे आता हरताळा या तलावाच्या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे काय स्वरुपी सुटणार आहे. सुमारे 30 वर्षांपूर्वी दुरदृष्टीच्या अभावामुळे ब्रिटिश सरकारच्या मदतीने राबविण्यात आलेल्या 81 गांवाच्या पाणीपुरवठा योजनेतील चुकीची दुरुस्ती होवून हरताळा गावाची तहाण कायमची भागणार आहे तसेच नवीन पाईपलाईनचे काम पुर्ण होण्याला साधारणतः सहा महिने लागणार आहे. जुन्या पाईपलाईनीमुळे मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकातील पाणी गळती व त्यातून उद्भवणारी रस्त्यांची दुरावस्था थांबविण्या साठी स्वखर्चातून पाईप उपलब्ध करून देण्याची तयारी आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दाखविली आहे. हे विषेश ! या प्रसंगी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निकम, उप अभियंता, जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता लोखंडे, मुक्ताईनगर, आमदार पाटील यांचे स्विय सहाय्यक प्रवीण पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य मनोहर खैरनार, संतोष कोळी आदी उपस्थित होते.

