खिर्डी बुद्रुकच्या लोकनियुक्त सरपंचपदी किरण कोळी विजयी


रावेर : तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत किरण पितांबर कोळी यांनी विजय मिळवला. ग्रामपंचायतीच्या सरपंच अपात्र ठरल्यानंतर प्रशासनाने येथे निवडणूक जाहीर केली होती तर रविवारी मतदान घेण्यात आले. लोकनियुक्त सरपंच पदासाठी किरण पितांबर कोळी, मधुकर प्रभाकर ठाकूर, बेबाबाई रामसिंग भील, सायरा संजय कोचुरे उमेदवार म्हणून रींगणात होते. त्यापैकी किरण पितांबर कोळी यांना 646 मते, मधुकर प्रभाकर ठाकूर यांना 499 मते, बेबाबाई रामसिंग भील 464 तर सायरा संजय कोचुरे यांना 260 मते मिळाली तर नोटा म्हणून 32 मतदारांनी पर्याय स्वीकारला. सर्वाधिक मते किरण कोळी यांना मिळाल्याने त्यांना या पदासाठी विजयी घोषित करण्यात आले. मत मोजणीला यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणूक सी.आर.महाले यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक म्हणून एस.बी.लोळपे यांनी मदत केली.गौरखेडा येथे झालेल्या ग्रामपंचायत सदस्याच्या पोट निवडणुकीत साहेबराव सदशिव पाटील यांना 101 मते मिळाल्याने ते विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी राहुल सुधाकर पाटील यांना 82 मते मिळाली. पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !