विद्युत शॉक लागून गायीसह बैल दगावला


जामनेर : तालुक्यातील रोटवद येथे विजेचा शॉक लागून गाय व बैल दगावल्याची घटना घडली. नारायण जाधव यांची गाय दगावली तर त्याच ठिकाणी संध्याकाळी कैलास दांडगे यांचा बैल शॉक लागून मृत्युमुखी पडला. या घटनेला महावितरण कंपनी व त्यांचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप आहे.

पदाधिकार्‍यांची धाव
घटनेची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील यांना मिळताच त्यांनी जामनेर तालुका शिवसेना पदाधिकारी भरत पवार (माजी युवासेना उपजिल्हा प्रमुख), अरुण पाटील (उप तालुका प्रमुख), पंढरी शिंदे (गण प्रमुख), ईश्वर चोरडिया (शिवसेना जामनेर तालुका कार्यकारीणी सदस्य), मुकेश जाधव (युवा सेना तालुका मिडिया प्रमुख), प्रकाश सूर्यवंशी, शिवसैनिक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !