Two More Cows Died Of Lumpy disease in Rawer Taluka रावेर तालुक्यात लंम्पी आजाराने आणखी दोन गायी दगावल्या
Two More Cows Died Of Lumpy disease in Rawer Taluka रावेर : रावेर तालुक्यात लम्पी आजाराने थैमान घातले असून केर्हाळा परीसरातील दोन गायींचा मृत्यूने झाल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रावेर तालुक्यातील लंम्पीग्रस्त भागाला भेट देण्याची मागणी पशुपालकांमधून होत आहे.
आजारावर नियंत्रण मिळवण्याची अपेक्षा
तालुक्यातील अहिरवाडीसह केर्हाळा परीसरातील दोन गायी लंम्पी आजाराने मृत्यु झाला. राजू तडवी व गोपाल सोनावणे यांच्या गायी गुरुवारी दगावल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अनेक गुरे लंम्पी आजाराने त्रस्त असून लंम्पी आजारावर रावेर तालुक्यात नियंत्रण मिळवण्याची मागणी होत आहे. जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रावेर तालुक्यातील लंम्पीग्रस्त भागाला भेट देण्याची मागणी होत आहे.

