अनोळखी लिंकला क्लिक करताना सावधान : जामनेरच्या एकाला 39 हजारांचा गंडा


A young man of Jamner was cheated of 39 thousand जामनेर : अनोळखी लिंकवर क्लिक करताच जामनेरच्या तरुणाला 39 हजारांचा आर्थिक फटका बसला. या प्रकरणी जामनेर पोलिसात अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

क्लिक करताच आर्थिक फटका
शेख सुफीयाना शेख कलिम (28, रा.जामनेर पुरा) यांच्या मोबाईलवर मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास 7381708207 या मोबाईलवरून एक एस.एम.एस.आला. एसएमएसमधील लिंकवर क्लिक करताच त्यांच्या क्रेडीट कार्डमधून 39 हजार रुपये कपात झालेत. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेख सुफीयाना यांनी 7381708207 या मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास हवालदार विनोद पाटील हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !