सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे साडीसह ब्लँकेटचे वाटप


जागतिक अपंग दिनानिमित्त अंध बंधू-भगिनींचा सन्मान

भुसावळ : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिनानिमित्त व स्नेहदिप निराधार महिला अंधाश्रमाचा द्वितीय वर्धापनदिनानिमित्त सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था व खान्देश अंध संघटना संचालित स्नेहदिप अंधाश्रम अंजाळा यांच्या संयुक्त विद्यमाने अंजाळे येथील 200 अपंग बंधू व भगिनींना साडी व ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी त्र्यंबक सपकाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग.स.सोसायटी संचालिका रागिणी चव्हाण, मनीषा सपकाळे, जि.प.कर्मचारी सरोज चौधरी होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रभाकर सुरळकर या अंधबांधवांच्या ईशस्तवन सादर करून व महामानवास आदरांजली वाहुन अभिवादनाने करण्यात आली. प्रसंगी अंध बंधूव भगिनींच्या हातून दीपप्रज्वलीत करून स्नेहादिप उत्सव साजरा करण्यात आला. प्रास्ताविक संस्थापिका राजनेवे तर सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. प्रसंगी
पतंजलीच्या टिमने अपंग बंधु व भगिनींची एक्युप्रेशर तपासणी करून विविध आजारांवर विविध योगासन व योग याविषयी मार्गदर्शन केले.

यांनी घेतले परीश्रम
सखी श्रावणी संस्थेच्या संस्थापिक राजश्री नेवे, माया चौधरी, अनुराधा टाक, आराधना टाक, स्मिता माहुरकर, राधिका वाणी, नीलिमा चौधरी, वंदना झांबरे, अ‍ॅड.जास्वंदी भंडारी, महानंदा पाटील, राजश्री बादशाह, तेजस्विनी प्रजापती, अंजली वाघमारे, रूपाली बर्‍हाटे, योजना पाटील, शुभांगी बर्‍हाटे, भाग्यश्री नेवे
यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यशस्वितेसाठी उमेश नेवे व दिलीपकुमार टाक यांचे सहकार्य लाभले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !