लोकनियुक्त सरपंचांचा शिवसेना पदाधिकार्‍यांकडून सन्मान


मुक्ताईनगर : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या तीन ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत उमेदवारी केलेल्या उमेदवारांचा विजय झाला. यात चिंचखेड खुर्द-तालखेड काशीराम वानखेडे तर महालखेड्यात प्रमोद कोळी (अनुसूचित जमाती) तसेच सारोळा येथे संगीता एकनाथ इंगळे (अनुसूचित जाती) प्रवर्गातून लोकनियुक्त सरपंचपदी शिवसेना पुरस्कृत उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाले. निवडीनंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. गावकर्‍यांनी दाखविलेल्या विश्वासास सदैव बांधील राहून ग्रामविकास विभागाकडून जास्तीत-जास्त विकास निधी संबंधित ग्रामपंचायतीला मिळवून देण्यास प्रयत्नशील असेल, असे मुंबई येथून आमदारांनी कळविले आहे.

नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार
सर्व नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सौभाग्यवती यामिनी चंद्रकांत पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, अ‍ॅड.मनोहरजी खैरनार, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका कल्पना पालवे, तालुका संघटिका शोभा कोळी, शहर संघटीका सरीता कोळी यांच्यासह असंख्य पदाधिकार्‍यांनी सत्कार केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !