Daughter burnt her father’s body in Warangaon वरणगावात पित्याच्या देहाला मुलीने दिला अग्नीडाग


Daughter burnt her father’s body in Warangaon वरणगाव : शहरातील शिवाजी नगरातील रहिवासी व गुजरातच्या वलसाड येथील एका कंपनीत उच्च पदस्थ पदावर कार्यरत असलेले विनय जयसिंगराव गायकवाड (50) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्यावर वरणगावातील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या दोन मुलींपैकी आकांशा हिने पित्याच्या मृतदेहाला अग्नीडाग दिला.

मुलगा-मुलगी समानच
इतकेच नव्हेतर इतर सोपस्कारही आकांशा हिनेच पार पाडले. विनय गायकवाड यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी, भाऊ, पुतणे असा परीवार आहे. ते भुसावळ पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी यांचे शालक होत.


कॉपी करू नका.