दोंडाईचातील दोघा अल्पवयीन चिमुकल्या बहिणींचा सर्पदंशाने मृत्यू


Report of snakebite of two minor sisters from Dondaich दोंडाईचा : तालुक्यातील वणी गावात दोघा अल्पवयीन बहिणींचा मण्यार जातीच्या सर्पाने दंश केल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे घडली. निकिता गणेश ठाकरे (11) व सविता गणेश ठाकरे (10) अशी मयत बहिणीची नावे आहेत.

पहाटेच्या सुमारास सर्पदंश
वणी (ता.शिंदखेडा) येथील गणेश दीपचंद ठाकरे (भील) हे मजुरी करून उदरनिर्वाह करतात. गावाबाहेरच त्यांचे घर असून रविवारी कुटुंबीयांसमवेत झोपले असताना पहाटे तीन वाजेच्या सुमारास मण्यार जातीच्या सर्पाने सविताला दंश केल्याने ती उठली तर त्याचवेळी निकितालाही सर्पाने दंश केला. दोघींना त्रास होऊ लागल्याने, पालकांनी पहिले निकिताला व नंतर सविताला दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॅा. ललितकुमार चंद्रे यांनी दोघींना सर्पदंशाचे इंजेक्शन देऊन तसेच उपचार करून त्यांना पुढील उपचारार्थ नंदुरबार येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.

चार तासांनी दुसरी बहिणही दगावली
उपचार सुरू असताना पहिले सविताचा मृत्यू झाला, त्यानंतर चार तासाने निकिताचा मृत्यू झाला. काही तासातच दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त झाली. े. दोघी बहिणी दोंडाईचा येथील आरडीएमपी हायस्कूलमध्ये शिकत होत्या. निकिता सातवीत तर सविता पाचवीच्या इयत्तेत होती. दोघींवर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 


कॉपी करू नका.