श्री क्षेत्र कोथळी येथील मुक्ताई मंदिरासाठी निधी देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

कोथळी येथील श्री संत मुक्ताई मंदिरात घेतले दर्शन : रखडलेल्या बांधकामाबाबत टिपणी तयार करून प्रस्ताव पाठवण्याचे आदेश

0

Shri Kshetra will fund the Muktai Temple at Kothali : Chief Minister Eknath Shinde’s testimony मुक्ताईनगर : श्री क्षेत्र कोथळी येथील मुक्ताई मंदिरासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, तातडीने टिपणी तयार करून प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना संबंधिताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. मुक्ताईनगर येथे तालुका क्रीडा संकलाच्या पटांगणावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी आयोजित केलेल्या शिवसेना मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री गण आले होते. मेळावा संपल्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी श्री क्षेत्र कोथळी येथील मुक्ताई मंदिरात जावून दर्शन घेतले.

यांची होती उपस्थिती
ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार राजू मामा भोळे उपस्थित होते. मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा मुक्ताईचा फोटो देऊन स्वागत केले. प्रसंगी हभप रवींद्र महाराज हरणे, उद्धव महाराज जुनारे, ज्ञानेश्वर हरणे व वारकरी उपस्थित होते. यावर्षी कोथळी येथे मुक्ताई मंदिरात मुक्ताईचा 725 वा अंतर्धान सोहळा झाला. या सोहळ्याचे कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करीत संस्थांनचे अध्यक्ष रवींद्र पाटील व विश्वस्त यांचे अभिनंदन केले.

निधी कमी पडू न देण्याची ग्वाही
मंदिर व मंदिर परीसरात सुरू असलेल्या कामांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली मात्र गेल्या तीन वर्षापासून बांधकामावर निधी मिळत नसल्याने काम रखडले असल्याचे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ यासंबंधी टिपणी तयार करून प्रस्ताव पाठवण्याची सूचना संबंधितांना केल्या तसेच यापुढे मंदिर बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री थांबले तीन मिनिट
शिवसेना मेळावा प्रसंगी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमावेळी बोदवड नगरपंचायतीचे सदस्यांच्या नंतर मुक्ताईनगर नगरपंचायतीचे सदस्य यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला परंतु नगरसेवक तीन वेळा माईकवर सांगूनही न आल्याने शेवटी आमदार चंद्रकांत पाटील यांनी माईक हातात घेऊन मुक्ताईनगरचे नगरसेवक कुठे गेले ? असा प्रश्न केला. मुख्यमंत्री शिंदे हे स्वागत समारंभासाठी उभे होतेफ या प्रक्रियेस जवळपास तीन मिनिटारचा कालावधी लागला. त्यानंतर मुक्ताईनगर नगरपंचायत नगरसेवक व्यासपीठावर आले व त्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.


error: Content is protected !!