अप-डाऊन नागपूर व वर्धा पॅॅसेंजर आज रद्द
भुसावळ : धामणगाव रेल्वे स्थानकावर नॉन इंटरलॉकींगच्या कामासाठी काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अप 51286 नागपूर-भुसावळ पॅसेंजर तसेच अप 51260 नागपूर-वर्धा पॅसेंजर तसेच डाऊन 51262 वर्धा-अमरावती तसेच डाऊन 51261 अमरावती-वर्धा पॅसेंजर व डाऊन 51261 अमरावती-वर्धा पॅसेंजर 11 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. अप 22886 टाटा-लोकमान्य टिळक टर्मिनल्स अंत्योदय एक्स्प्रेस 15 रोजी तर डाऊन 22885 लोकमान्य टिळक टर्मिनल्स-टाटा अंत्योदय एक्स्प्रेस 17 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.
