वरणगाव शहरासाठी भूमिगत गटार प्रकल्प मंजूर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे साकडे


Approve Underground Sewerage Project For Warangaon City वरणगाव : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांचे भारतीय जनता पार्टी, वरणगाव शहरातर्फे वरणगावात बुधवारी सायंकाळी जल्लोषात स्वागत करण्यात आले. वरणगाव तालुका व्हावा, बंद पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती द्यावी, शहराला भूमिगत गटारींचा प्रकल्प द्यावा तसेच वरणगाव नगरपालिका कर्मचार्‍यांचे सरसकट समावेशन करावे, नगरपरीषदेला भरघोस प्रकारचा निधी द्यावा आदी मागण्यांचे निवेदन माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिले.

यांची होती उपस्थिती
यावेळी शहराध्यक्ष सुनील माळी, गोलू राणे, नटराज चौधरी, कदीर शेठ, हाजी अल्लाउद्दीन शेठ, साबीर कुरेशी, अलीम भाई, निजाम भाई, अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, हितेश चौधरी, कमलाकर मराठे, मनीषा पाटील, आकाश निमकर, डी.के.खाटीक, भाजयुमो सरचिटणीस कैलास पाटील, बळीराम सोनवणे, दगडू माळी, भाजपा तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, जय चांदणे, रमेश मामा पालवे, अरुण बावणे, शंकर पवार, ज्ञानेश्वर घाटोळे, पप्पू ठाकरे, रामभाऊ माळी, छोटू सेवतकर, सुभाष पोतदार, हमीद भाई, अंजू कुरेशी, रॉक कश्यप, प्रकाश मराठे, ऋषिकेश महाजन, मयूर शेळके, नानाभाऊ चौधरी , डॉ.सादिक किरण वंजारी, फजल शेख उपस्थित होते.


कॉपी करू नका.