Another Bike Theft From Jalgaon : Thief In The Net जळगावातून पुन्हा दुचाकीची चोरी : चोरटा जाळ्यात


Another Bike Theft From Jalgaon : Thief In The Net जळगाव : शहरात दुचाकी चोरींचे सत्र कायम असून तरुणाची शहरातील तांबापूरा भागातील दत्त मंदीराजवळून चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत मंगळवार, 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्याला अटक करण्यात आली.

दुचाकीसह चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
ज्ञानेश्वर शिवलाल चव्हाण (38, रा.शेंदुर्णी, ता.जामनेर) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार, 12 ऑगस्ट रोजी दुपारी ज्ञानेश्वर चव्हाण हा तांबापूरा परीसरातील दत्त मंदीराजवळ राहणार्‍या नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकी (एम.एच.19 सी.क्यू. 175) ने आल्यानंतर मुक्कामी थांबला मात्र तरुणाने दुचाकी दत्त मंदीराजवळ रात्री 10 वाजता पार्क केल्याची मध्यरात्री चोरट्यांनी संधी साधली. मंगळवारी सकाळी आठ वाजता दुचाकी चोरीला गेल्याची बाब उघडकीस आली. महिनाभरानंतर मंगळवारी तरुणाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी संशयीत आरोपी शंकर विश्वनाथ साबळे (रा.गेंदालाल मिल, जळगाव) याला अटक करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.


कॉपी करू नका.