धुळ्यासह जळगाव जिल्ह्यातून चोरलेल्या 15 दुचाकींसह चोरटे शिरपूर पोलिसांच्या जाळ्यात


Thieves with 15 bikes stolen from Dhula and Jalgaon district in Shirpur police net शिरपूर : तालुका पोलीस स्टेशन हद्दीत बोरमळीपाडा येथून शहर पोलिसांनी चोरीच्या 8 लाख 30 हजाराच्या 15 दुचाकी केल्या जप्त केल्या असून दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली. चुनीलाल उर्फ गणेश उर्फ गुठ्या भोल्या पावरा (बोरमळी, पो.मेलाणे ता.चोपडा, जि.जळगाव) व दत्तु उर्फ दीपक कुमार पावरा (बोरमळीपाडा, भोईटी, ता.शिरपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

संशयावरून आरोपी जाळ्यात
शिरपूर शहरातील करवंद नाक्यावर संशयास्पद फिरणार्‍या दोघांना शोध पथकाने ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडील दुचाकी चोरीची आढळली. आरोपींनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरमळी येथून धुळे व जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून 15 दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यातील धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात दाखल सात गुन्हे शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने उघडकीस आणल्याची जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी दिली.

शहर पोलिस ठाण्यात दुचाकी जमा
शिरपूर तालुक्यातील बोरमळीपाडा येथून घराच्या आडोश्याला उभ्या करून ठेवलेल्या 15 मोटरसायकली आरोपीने काढून दिल्या. शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने सदर दुचाकी जप्त करीत शहर पोलीस ठाण्यात उभ्या केल्या आहेत.

यांनी केली आरोपींना अटक
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश आहेर, शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, विनोद आखडमल, मुकेश पावरा, गोविंद कोळी, प्रवीण गोसावी, प्रशांत पवार, नाना अहिरे आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.