In Bhusawal, The Young Policeman is in the net With Gavathi Katta And Two Live Cartridges भुसावळात गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह तरुण पोलिसांच्या जाळ्यात

बाजारपेठ पोलिसांच्या शोध पथकाची कामगिरी : अवैध अग्निशस्त्र पुन्हा चर्चेत


In Bhusawal, The Young Policeman is in the net With Gavathi Katta And Two Live Cartridges भुसावळ : शहरातील राहुल नगरातील वाल्मीक समाजाच्या आखाड्या समोरील मोकळ्या पटांगणात गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह 29 वर्षीय तरुणाला बाजारपेठ पोलिसांच्या शोध पथकाने गुरुवारी अटक केली आहे. आकाश राजेश टाक (29, वाल्मीक नगर, 72 खोली, भुसावळ) असे संशयीताचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना अवैधरीत्या अग्निशस्त्र बाळगणार्‍याबाबत माहिती मिळाल्याने त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील शहरातील राहुल नगर भागातील वाल्मीक समाजाच्या आखाड्या समोरील मोकळ्या पटांगणात गुरुवारी सायांकळी संशयीत आकाश राजेश टाक यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची झडती घेतल्यानंतर 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व एक हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिस नाईक शशीकांत पांडुरंग तायडे यांच्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिसात संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर, निलेश चौधरी, उमाकांत पाटील, तुषार पाटील, प्रशांत परदेशी, योगेश माळी, सचिन चौधरी, प्रशांत सोनार, दिनेश कापडणे आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.