Suspect With Gawathi Katta And Five Live Cartridges In Dhule City Police Net गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसांसह संशयीत धुळे शहर पोलिसांच्या जाळ्यात


Suspect With Gawathi Katta And Five Live Cartridges In Dhule City Police Net धुळे : धुळे शहर पोलिसांनी गावठी कट्टा व पाच जिवंत काडतूस बाळगणार्‍या रवींद्र उर्फ राजू हनुमान वर्मा (53, रा.सहजीवन नगर, शासकीय दुध डेअरी रोड, धुळे) या संशयीताला शुक्रवारी सकाळी आठ वाजता शासकीय दुध डेअरी परीसरातून अटक केली आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना सहजीवन नगर, शासकीय दुध डेअरी रोड परीसरात एक इसम गावठी कट्टा बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. शुक्रवारी सकाळी पथकाने धाव घेत संशयीताला अटक केली. संशयीताच्या ताब्यातून 27 हजार 500 रुपये किंमतीचा गावठी कट्टा व पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास भिकाजी पाटील करीत आहेत.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, धुळे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बी.जी.शेवाळे, भिकाजी पाटील, कुंदन पटाईत, प्रवीण पाटील, मनिष सोनगिरे, तुषार मोरे, अविनाश कराड, गुणवंत पाटील, शाकीर शेख यांच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.