Harassment Of Married Women in Pimprala : Crime against husband and in-laws  पिंप्राळ्यातील विवाहितेचा छळ : पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा


Harassment Of Married Women in Pimprala : Crime against husband and in-laws जळगाव : पिंप्राळ्यातील माहेरी असलेल्या विवाहितेचा छळ करणार्‍या पतीसह सासरच्या मंडळीविरोधात बुधवारी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

हुंड्याच्या पैशांसाठी छळ
जळगाव शहरातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या स्वाती सुनील बाविस्कर (35) यांचा विवाह चोपडा तालुक्यातील गोरगावले येथील सुनील आधार बाविस्कर यांच्यासोबत झाल्यानंतर लग्नाच्या तीन वर्षांनी पती सुनील यांनी यांच्यासह सासू, सासरे यांनी स्वाती यांचा हुंड्यांच्या पैशांसाठी छळ केला. याच कारणावरुन स्वातीला शिविगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली.

यांच्याविरोधात गुन्हा
छळाला कंटाळून अखेर स्वाती बाविस्कर या माहेरी पिंप्राळा येथे निघून आल्या व त्यांनी छळाबाबत बुधवार, 21 सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्याने पती सुनील आधार बाविस्कर, सासू हिराबाई आधार बाविस्कर, सासरे आधार बुधा बाविस्कर (तिघे रा.गोरगावले, ता.चोपडा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.