चुंचाळ्यासह साकेगावात आज दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रम


यावल : तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चुंचाळे येथे श्री समर्थ सुखनाथ बाबा यांची तपोभुमी व रघुनाथ बाबा यांची जन्मभुमी तसेच श्री संमर्थ वासुदेव बाबा यांची कर्मभुमी म्हणून संपुर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातही प्रचलीत आहे. श्री समर्थ वासुदेव बाबा यांनी चुंचाळ्यात आपल्या शिष्याच्या मदतीने आपले आजागुरु म्हणजे सुखनाथ बाबा यांच्या नावाने मोठे दरबार या ठिकाणी उभारले आहे. त्यात दत्त मंदिर, श्री राम मंदिर व विठ्ठल रुख्मिनी मंदिर उभारले असून दत्त जंयतीच्या एक दिवस अगोदर हजरत गैबनशाह बाबाचा यात्रोत्सव येथे भरतो. त्यामुळे हजारोंच्या उपस्थितीत भाविक दर्शनासाठी येथे येतात. या दरबारात सलग सात दिवस दत्त पारायणाचे वाचन सुरू असून त्याचा समारोप दत्त जंयतीला होत आहे.

आज विविध धार्मिक कार्यक्रम
बाहेर गावाहून येणार्‍या भाविकासाठी चुंचाळे फाटा ते चुंचाळेपर्यंत रीक्षा युनियनचे चालक मोफत भाविकांची ने-आण करतात. दरम्यान, बुधवारी सकाळी सहा वाजता समाधी स्नान, सातला मारोती स्नान, आठपासुन ते दुपारी 12 ते 1 आरतीची वेळ सोडून भजन व भारुडांचा कार्यक्रम तर दुपारी एक ते रात्री सातपर्यंत महाप्रसादाचे वाटप होईल. परीसरातील भजनी मंडळानी उपस्थिती द्यावी, असे आवाहन श्री समर्थ वासुदेव बाबा भजनी मंडळाने केले आहे. दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा,असे आवाहन वासुदेव बाबा शिष्य व चुंचाळे बोराळे येथील ग्रामस्थांनी केले आहे.

साकेगावात आज भंडारा
साकेगाव-
श्री गुरूदेव दत्त मंदिर संस्थानतर्फे दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांसह भंडार्‍याचा कार्यक्रम बुधवारी होणार आहे. मंदिराला गतवर्षी क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असून आगामी काळात भक्तनिवास, सभागृह, वाचनालय व उद्यानाची उभारणी केली जाणार आहे. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भुसावळात गुरुवारी भंडारी
भुसावळ-
छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील दत्त मंदिरावर दत्तजयंती निमित्त गुरुवार, 12 रोजी रोजी दुपारी 12 ते 3 या वेळात महाप्रसाद भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवाजी जगदाळे, गणेश वकारे, सतीश घुले, सुनील भोळे, प्रभाकर रणदिवे, अनिल सोनवणे, रवी बाविस्कर, बापू जगताप, राजेश चौधरी, महेश निकम, निलेश इंगळे, राहुल कुलकर्णी आदींनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !