अल्पवयीन तरुणीला चाळीसगावातून पळवून नेत अत्याचार : तिघा तरुणांविरोधात गुन्हा


Abuse of minor girl in Chalisgaon: Crime against three चाळीसगाव : शहरातील एका भागातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता घडली. या प्रकरणी तीन जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा चाळीसगाव शहर पोलिसात दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा
चाळीसगावच्या एका भागातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस तिघांनी जणांनी संगनमत करून एका प्रार्थनास्थळाजवळ बोलावले व तेथून तिला दुचाकीवर बसवून औरंगाबाद रस्त्यावरील एका मक्याच्या शेतात नेले. यानंतर संशयीत आरोपी नाना गोरख आहिरे (रा.तळवाडे, ता.नांदगाव, जि.नाशिक) याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. . या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात नाना अहिरेसह अन्य दोन अनोळखी तरुणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय सागर ढिकले हे करीत आहेत.


कॉपी करू नका.