विजेच्या धक्क्याने आसोद्याच्या तरूणीचा मृत्यू


जळगाव : तालुक्यातील आसोदा येथील ३२ वर्षीय तरूणीचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. पूनम धनराज भोळे (३२) असे मयत तरुणीचे नाव आहे.

जागीच झाला मृत्यू
जळगाव तालुक्यातील आसोदा येथे पूनम ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला होती. गुरुवार, २२ सप्टेंबर रोजी तिला विजेचा जोरदार धक्का लागला व तिचा जागीच मृत्यू झाला. तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सुधाकर शिंदे करीत आहे.


कॉपी करू नका.