Crime Against five persons including Former Mayor Of Dharangaon, Nilesh Chaudhary शेत जमिनीच्या नोंदीत फेरफार : धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरींसह पाच जणांविरुद्ध गुन्हा


Crime Against five persons including Former Mayor Of Dharangaon, Nilesh Chaudhary जळगाव : शेत जमिनीच्या नोंदीत फेरफार केल्याप्रकरणी धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

यांच्या विरोधात गुन्हा
नायब तहसीलदार जयंत पुंडलिक भट्ट यांनी धरणगाव पोलिसात फिर्याद दिली. शेत जमिनीत फेरफार केल्याप्रकरणी भरतसिंग देविदास परदेशी (नाशिक), निलेश सुरेश चौधरी (माजी नगराध्यक्ष, धरणगाव), वनराज बुधा पाटील (तत्कलीन मंडळ अधिकारी,साळवा), रोशनी मोरे (तत्कालीन तलाठी नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

जमिनीत फेरफार केल्याचा आरोप
याबाबत देविदास रामदास रडे (रा.नांदेड) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार धरणगाव गट क्षेत्र असून आर या शेतजमिनीवर इतर कोर्टाचे आदेश नसतांना सदर जमीन फेरफार करण्यात आला. याबाबत महसूलने अहवाल सादर केला असून स्थानिक स्वराज संस्था यांना अधिकार नसतांना त्यांनी कोणत्या अधिकारात दाखला दिला तसेच पदाचा दुरुउपयोग करून हा दाखला संबंधित व्यक्तीने दिल्याचा आरोप आहे.

असे आहेत तक्रारीत आरोप
नियमबाह्य नोंदी करण्यासाठी बेकायदेशीर कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक करणे, यासह 49 वर्षानंतर वारस नोंद मंजूर करणे, चुकीच्या नोंदीवरून नोंद खारीज करण्याचेही अधिकार असतानाही नोंद मंजूर करणे, चुकीची नोंद पडताळून न बघणे, प्रशासकीय गोष्टीकडे दुर्लक्ष करणे, चुकीचा दस्त देणे, चुकीचा दस्त देत शासनाची फसवणूक करणे, यासारखे गंभीर आरोप फिर्यादीत आहेत. पुढील तपास पीएसआय गुंजाळ हे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !