In Jalgaon, the rumor of the murder of a young man actually died after falling from the stairs जळगावात तरुणाच्या खुनाची अफवा प्रत्यक्षात मात्र जिन्यावरून तोल जावून पडल्याने मृत्यू


In Jalgaon, the rumor of the murder of a young man actually died after falling from the stairs जळगाव : जळगावच्या न्यू बी.जे.मार्केट परीसरात जीन्याजवळ 22 वर्षीय तरुण मृतावस्थेत असल्याची माहिती शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर खून झाल्याची सर्वत्र अफवा पसरल्याने गर्दी वाढली मात्र जिल्हापेठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तरुणाचा जीना उतरताना तोल जावून पडल्याने मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला. अश्विन उर्फ विठ्ठल उर्फ कान्या नितीन मोरे (22, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परीसर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिसांची धाव
कान्या मोरे या तरुणाचा मृतदेह शनिवारी पहाटे नवीन बी.जे.मार्केटच्या तळघरात आढळला. डोक्याजवळ रक्त पडलेले असल्याने तरुणाचा खून झाल्याची अफवा गावात पसरली. घटनास्थळी जिल्हापेठ पोलिसांसह पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी धाव घेतली.

डोक्याला मार लागून मृत्यू
जिल्हापेठ पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता अश्विन मोरे हा नशेत जीना उतरला आणि पुढे जात असताना जीन्याच्या भिंतीवर पडला. डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !