जळगावात दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरुणावर ब्लेडने वार


A young man was stabbed with a blade for not paying to drink alcohol in Jalgaon जळगाव :  शहरातील भंगार विक्रेत्याने दारू पिण्यासाठी पैसे दिले न दिल्याने त्याच्यावर ब्लेडने वार करून गंभीर दुखापत करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा दाखल
भंगार व्यावसायीक अरबाज रउफ खाटीक (24, रा.जुम्मा शहा वखार, जळगाव तांबापूरा, जळगाव) या तरुणाकडे शुक्रवार, 23 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास संशयीत समीर काकर (रा.तांबापूरा, जळगाव) याने
दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली मात्र दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने समीरने हातातील ब्लेडने वार करून कानाला गंभीर दुखापत केली. तरुणाला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलिसात समीर काकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !