भुसावळातील विवाहितेचा छळ : मुलूंडच्या पतीसह सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा
Harassment of a married woman in Bhusawal : A Case Against Mulund’s Husband And In-Laws भुसावळ : सासरी नांदायचे असल्यास माहेरून पैसे घेऊन ये, असे वारंवार विवाहितेला सांगत तिचा छळ करण्यात आला. या प्रकरणी भुसावळातील विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात पती, सासरे, सासू विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
माहेरून खर्चासाठी पैसे घेऊन ये, असे वारंवार सांगत विवाहितेचा 12 मे 2015 ते 5 नोव्हेंबर 2020 या काळात शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी विवाहिता निलीमा केयुर धांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात पती कयुर जयप्रकाश धांडे, सासरे जय प्रकाश धांडे, सासू चित्रा धाडे (रा. केळकर कॉलेज समोर, मुलुंड (पूर्व)) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. महिला हवालदार अर्चना अहिरे पुढील तपास करीत आहे.

