वरणगाव रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्यांचा थांबा पूर्ववत करा

केंद्रीय रेल्वे मंत्री नरावसाहेब दानवे पाटील यांना निवेदनाद्वारे साकडे


वरणगाव : वरणगाव रेल्वे स्टेशनवर कोरोना काळापूर्वी अप-डाऊन सेवाग्राम, अप-डाऊन अमरावती सुरतफास्ट एक्स्प्रेस, अप-डाऊन नागपूर-भुसावळ पॅसेंजर गाड्यांना थांबा होता मात्र कोरोना हटताच थांबा रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. या गाड्यांचा थांबा पूर्ववत करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली. मागण्यांबाबत सकारात्मक दखल घेण्याचे आश्वासन दानवे यांनी दिले.

या मागण्यांबाबत दिले निवेदन
वरणगाव रेल्वे स्टेशनवर अमरावती-मुंबई एक्स्प्रेसला तसेच मुंबईकडे जाणार्‍या शालिमार एक्स्प्रेसला व सकाळी नागपूरकडे जाणार्‍या महाराष्ट्र एक्स्प्रेसला नव्याने थांबा देण्यात यावा, तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराजवळ रेल्वे उड्डाण पुलासह सिध्देश्वर नगराजवळ भूमिगत रेल्वे पुल मंजूर करावा तसेच वरणगाव रेल्वे स्टेशनवर आरक्षण खिडकी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. भाजपा शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, नाना चौधरी, किसान मोर्चा अध्यक्ष ऋषिकेश महाजन आदींची प्रसंगी उपस्थिती होती.


कॉपी करू नका.