भुसावळातील साईश्वर मंडळ विविध उपक्रमांनी साजरा करणार नवरात्सोत्सव
भुसावळ : शहरातील श्री साईश्वर नवदुर्गा मंडळ यंदाचा नवरात्रोत्सव नाविण्पूर्ण उपक्रमांनी साजरा करणार आहे. श्री साईश्वर नवदुर्गा मंडळ, संतोषी माता हॉल समोरील रींगवर यंदा दुर्गोत्सवाची स्थापना करीत असून मंडळातर्फे उत्सव दुर्गेचा, जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमांतर्गत यंदा नवरात्री उत्सवात दररोज विविध क्षेत्रातील अगदी स्वछता कर्मचारी ते उच्च शिक्षित कार्यकर्तृत्ववान कृतिशील महिलांच्या हस्ते दररोज दुर्गा मातेची आरती करणार आहे. या महिलांना ‘श्री शक्ती सन्मान 2022’ हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येईल.
असे आहेत कार्यक्रम
28 रोजी ‘मुलगा वयात येताना’ व 29 रोजी ‘मुलगी वयात येताना’ या विषयावर दुपारी चार वाजता जळगाचे प्रा. दिलीप भारंबे यांचे व्याख्यान तर 30 रोजी सकाळी सहा वाजता योग शिबिर तसेच दुपारी चार वाजता ‘आडवा अज्ञान, वाढवा विज्ञान’ या विषयावर डॉ.कटारीया यांचे व्याख्यान, संध्याकाळी सहा वाजता श्री अवधूत शिवानंद स्वामी यांचे अलौकिक तंत्रोक्त दुर्गा सप्तशती सामूहिक पाठ आयोजन, 1 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता योग शिबिर, सायंकाळी 7.30वा भुसावळमधील प्रसिद्ध पिंकेथॉन ग्रुपतर्फे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण तसेच 2 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता योग शिबिर, सकाळी नऊ वाजता गोदावरी मेडिकल महाविद्यालयातर्फे मोफत नेत्ररोग व थायरॉइड आरोग्य तपासणी शिबिर तसेच 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता विपश्यना ध्यान पद्धतीवर मार्गदर्शन तसेच संध्याकाळी आठ वाजता ‘हाउजी गेम’ चे आयोजन करण्यात आले आहे. 6 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता शेकडो महिलांच्या हस्ते सामूहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महिलांना नवदुर्गा उत्सवामध्ये मी रणरागिनी, मैं भारत की बेटी हू या संकल्पनेत आपला सेल्फी फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला आहे. उत्सवात नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री साईश्वर नवदुर्गा मंडळाच्या आयोजकांनी केले आहे.

