पहिल्या आमदार निधीतून तेली समाज मंगल कार्यालयाला निधी देणार
आमदार चंद्रकांत पाटील : तेली समाजातर्फे सत्कार
मुक्ताईनगर : माझ्या पहिल्या आमदार निधीतून तेली समाज मंगल कार्यालयाच्या निर्मितीसाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार तसेच इतर मित्र आमदार यांच्याकडूनही भरीव निधी आणण्यास पुढाकार घेणार असून मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेत मुक्ताईनगरातील प्रश्न तडीस नेण्याची संधी दिली आहे त्यामुळे या विश्वासास सदैव बांधील राहून पिण्याच्या पाण्याची समस्या, व्यापारी संकुल, मतदारसंघातील बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न असेल व शेती व शेत मजुरांना शासनाकडून मिळणार्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याची ग्वाही आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. मुक्ताईनगर येथील तेली समाजातर्फे संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. प्रसंगी भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्याही सत्कार करून वाढदिवस व्यासपीठावर साजरा करण्यात आला. त्यांनीही सत्कार स्विकरत सदैव समाजासाठी उभा असून तेली समाज मंगल कार्यालय बांधकामासाठी एक लाख एकशे अकरा रुपये देणार असल्याची त्यांनी घोषणा केली.
जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन
तेली समाजातर्फे समाज भूषण संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रवर्तन चौकात भव्य आरास करून प्रतिमा पूजन करण्यात आले. विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी समाजातर्फे जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच सायंकाळी सात वाजता समाजातर्फे जयंती उत्साहात साजरी करून नवनिर्वाचित आमदार यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. आमदार चंद्रकांत पाटील यांचा सत्कार तेली समाजाच्या वतीने करण्यात आला तर भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचा सत्कार तेली समाज अध्यक्ष विठ्ठल तळेले यांनी केला.
व्यासपीठावर यांची उपस्थिती
प्रसंगी व्यासपीठावर तेली समाजाचे माजी अध्यक्ष अशोक बोराखेडे, माजी सरपंच रमेश सापधरे, निनाजी खेवलकर, काशीनाथ मंडवाले, राजेंद्र तळेले, रमेश नारायण सापधरे, प्रकाश खेवलकर, शामराव तळेले, रमेश तळेले, कैलास दैवे, सुरेश कपले, राजेंद्र कपले, दामोदर काठोके, शिवसेना नगरसेविका सविता भलभले, ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य रेणुका तळेले, संगीता मनसुटे, ज्योती नायसे, मनीषा खेवलकर, विजया जावरे, शालिनी गलवाडे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नरेंद्र सापधरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त तेली समाज बांधव व युवकांनी परीश्रम घेतले.

