चाळीसगावच्या अलका वामन सरदार यांना ‘नेशन बिल्डर अवार्ड’ जाहीर
कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी केली पायपीट
‘Nation Builder Award’ announced to Alka Vaman Sardar of Chalisgaon चाळीसगाव : वलठाण येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील ज्येष्ठ उपशिक्षिका अलका वामन सरदार यांना रोटरी क्लब आॕफ मिल्क सिटीचा यंदाचा नेशल बिल्डर अवार्ड जाहीर झाला असून २५ रोजी एका विशेष सोहळ्यात खा. उन्मेष पाटील, आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना तो प्रदान करण्यात येणार आहे. सरदार यांनी कोरोना काळात थेट नंदुरबार जिल्ह्यात जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके पोहचविण्यासाठी पायपीट केली. याच काळात वाडी – वस्त्यांवर जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना अध्यापनही केले. अध्यापनात आदिवासी बोली भाषेचा वापरही त्या करतात. त्यांच्या याच शैक्षणिक प्रयोगांची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

