भुसावळातील प्राचीन महालक्ष्मी मंदिरात घटस्थापना उत्साहात
उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन : 2001 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार
Ghatasthapana in the ancient Mahalakshmi temple in Bhusawal in excitement भुसावळ : शहरातील खडका रोड भागातील सुमारे 300 वर्षांपूर्वीचे प्राचीन देवस्थान असलेल्या महालक्ष्मी मंदिरात सोमवारी सकाळी पारंपरीकरीत्या विधीवत पूजनानंतर घटस्थापना करण्यात आली. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
2011 मध्ये जीर्णोद्धार
पुरातन मंदिराची पडझड होत असल्याने भाविकांनी एकत्र येऊन जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला. 2001 मध्ये हे मंदिर भव्य स्वरूपात पुन्हा उभे राहिले. जीर्णोद्धारासोबतच वृक्षारोपण केल्याने मंदिराचा परीसर हिरवळीने नटला आहे.नवरात्रीमध्ये महापूजा, रुद्राभिषेक, सप्तशती पाठ ,नंदादीप, कुंकूमार्जर ,ललित पंचमी, अलंकार पूजा, नवचंडीचे पाठ आणि अष्टमीला महायज्ञ असे विविध कार्यक्रम होणार आहेत. महालक्ष्मी मंदिराच्या आवारातच राम भक्त हनुमान व परशुराम मंदिर बांधण्यात आले असून भाविकांना हनुमान व परशुरामांचेही दर्शन घेता येते. सोयीचे होते.विशेष म्हणजेच मंदिरात येणार्या भाविकांसाठी वाचण्यास विविध प्रकारचे दुर्मिळ ग्रंथ देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रामुख्याने नवरात्रोत्सवात मंदिराचे सौंदर्य खुलते. आकर्षक रोषणाई धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसर गजबजतो.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी महालक्ष्मी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिकेत सुधीर पाटील, सुरेश डिगंबर बर्हाटे, मनोहर लक्ष्मण बर्हाटे, प्रकाश देवचंद पाटील, चंद्रकांत पाटील, सुधीर गंगाधर पाटील, लिलाधर भारंबे, किशोर गंगाधर पाटील, रवींद्र पाटील, विनोद पाटील, मधुकर लोखंडे, विकास कोळी, संजय नेमाडे, माऊली भारंबे व पुजारी निवृत्ती सोनार, किशोर अरुण पाटील, वासुदेव सोमा पाटील व महालक्ष्मी ग्रुप, जय लेवा ग्रुपच सदस्य उपस्थित होते.
