कट लागल्याचे निमित्त : जळगावात एकास मारहाण ; चौकडीविरोधात गुन्हा
Assault due to two-wheeler plot: Crime against four जळगाव : दुचाकीचा कट लागल्याच्या निमित्ताने एकाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी चौघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
किरकोळ वादातून मारहाण
रामानंदनगर पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील खंडेराव नगरात हमीदखान रीयासत खान हा रविवार, 25 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास खंडीराव नगरातील दुर्गा प्रोव्हीजन दुकानासमोरून दुचाकीने जात असतांना दुचाकीचा कट गण्या उर्फ गणेश प्रकाश शिंदे (22, खंडेराव नगर, जळगाव) याला लागला. त्यावरून गणेशने त्याचे मित्र खंड्या उर्फ सनी प्रेमनाथ उनप (22), भुर्या उर्फ प्रविण सुभाष पाटील (30) आणि एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. खंडेराव नगर, जळगाव) यांनी येवून हमीदखान रीयासत खान याला चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून शिविगाळ करत दमदाटी करून जीवेठार मारण्याची धमकी दिली.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
याप्रकरणी हमीद खान रियासत खान याचे नातेवाईक शाहरूख शेख महमूद यांनी सायंकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने गणेश शिंदे, सनी उनम, प्रवीण पाटील आणि एका अल्पवयीन मुलावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सुशील चौधरी करीत आहे.
