भुसावळात शिवरत्न प्रतिष्ठान मंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
Various programs on the occasion of Navratri Festival organized by Shiv Ratna Pratishthan Mandal in Bhusawal भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील गायत्री नगरात शिवरत्न प्रतिष्ठानतर्फे माजी नगरसेवक रमाकांत महाजन यांच्या नेतृत्वात देवीची विधीवत स्थापना करण्यात आली. उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन संत तोताराम महाराज लेवा पाटीदार नवयुवक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
असे होतील कार्यक्रम
बुधवारी रात्री आठ वाजता गोप सादरीकरण, गुरुवार, 29 रोजी रात्री आठ वाजता ‘शिवरत्न होम मिनिस्टर स्पर्धा’ स्पर्धा होईल. स्पर्धेतील पहिल्या विजेत्याला सोन्याची मराठमोळी नथ व दुसर्या विजेतीला पैठणी देण्यात येईल. शुक्रवार, 30 रोजी रात्री आठ वाजता दांडिया स्पर्धा होईल व आकर्षक बक्षिसे दिली जातील. शनिवार, 1 ऑक्टोंबर रोजी गरबा डान्स फ्यूजन स्पर्धा, रविवार, 2 रोजी दांडिया स्पर्धा, सोमवा, 3 रोजी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, मुला-मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा व कुंवारीका पूजनाचा कार्यक्रम होईल. मंगळवार, 4 रोजी रात्री सात वाजता पिंकेथॉन महिला मंडळातर्फे गरबा सादरीकरण, बुधवार, 5 रोजी दसरा स्पेशल दांडिया घेण्यात येईल तसेच गुरुवार, 6 रोजी सकाळी 11 वाजता देवी विसर्जन होईल. यानंतर मंडळातील सदस्यांसाठी श्री रुद्र तापेश्वर दत्त मंदिर, ईखे फार्म, यावल रोड, पोदार स्कूल समोर भंडार्याचे आयोजन करण्यात आल्याचे शिवरत्न प्रतिष्ठानचे रमाकांत महाजन कळवले आहे.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
नवरेत्सवात यशस्वीतेसाठी शिवरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोलु राणे, उपाध्यक्ष पवन बाक्से, सचिव पंकज माळी, माजी नगरसेविका सोनल महाजन, माजी नगरसेवक बापू महाजन आदी परीश्रम घेत आहेत.

