पोलिस भरती होण्याचे स्वप्न पाहणार्‍यांसाठी ही बातमी महत्त्वाची : राज्य पोलिस दलात 20 हजार जागा भरल्या जाणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


The dream of joining the police force will come true: Recruitment for 20 thousand posts in the state soon
मुंबई :
पोलिस दलात भरती होण्याचे बेरोजगार तरुणांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत गुड न्यूज दिली आहे. माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी राज्यात 20 हजार पदांवर भरती केली जात असल्याचे सूतोवाच केले असून यापूर्वी आठ हजार पदांसाठी जाहिरात निघाली असून लवकरच 12 हजार जागांसाठी देखील भरती होईल, असे सांगून फडणवीस यांनी तरुणांना आश्वस्त केले आहे.

पोलिसात जाण्याचे स्वप्न होणार साकार
फडणवीस म्हणाले की, राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या मोठी असून हे तरुण चांगले शिक्षित आहेत. अशा वेळी त्यांच्या हाताला काम नसल्याने ते बेकार असल्याचे पाहायला मिळते. अशा वेळी जर पोलिस भरती निघाली तर अनेकांच्या हाताला काम आणि कुटुंबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी त्याचा फायदा होईल. राज्यात महाविकासआघाडी सरकार असतानाच पोलीस भरतीसंदर्भात हालचाली झाल्या होत्या मात्र नेमक्या वेळी राज्यावर कोरोना महामारीचे मोठे संकट आले. परीणामी सर्व यंत्रणाच ठप्प झाली किंवा त्याला मर्यादा आल्या त्यामुळे पोलीस भरती रखडली होती.

पारदर्शीपणे होणार भरती प्रक्रिया
राज्यात 75 हजार पोलिसांची भरती करण्याबाबत राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण करत पारदर्शीपणे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कुठल्याही परीरस्थितीत संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेतह.

पोलिस महासंचालकांमार्फत पद भरती
राज्यामध्ये घोषणा करण्यात आलेल्या एकूण पदांपैकी सध्या 7231 पदांना मान्यता देण्यात आली आहे. पोलिस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान, भरतीवेळी लेखी परीक्षेपूर्वी अगोदर शारिरिक चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी मुंबईमधील 20 मैदानांवर संपूर्ण तयारी करण्यास सांगण्यात आले आहे.


कॉपी करू नका.