शिंदे-ठाकरे वाद : शिंदे गटाचे विलीनीकरण हा एकमेव मुद्दा : ठाकरे गटाने मांडली न्यायालयात बाजू


Shinde-Thackarey dispute : Merger of Shinde group is the only issue: Thackeray group presented its side in court नवी दिल्ली : शिंदे-ठाकरे या वादाबाबत सुप्रीम कोर्टात मंगळवारी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सुनावणी घेण्यात आली. एखाद्या गटाला मान्यता नसेल तर त्यावर निवडणूक आयोग कसा निर्णय घेऊ शकतो असा सवाल ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात उपस्थित केला. आमदारांच्या अपात्रतेबाबत मूळ याचिका कोर्टात प्रलंबित असताना निवडणूक आयोगानं कुठलाही निर्णय घेऊ नये, अशी वारंवार मागणी ठाकरे गटाच्या वकिलांनी कोर्टात केली. 19 जुलैच्या स्थितीनुसार कोर्टाला निर्णय घ्यावा लागेल. विलीनीकरण हा एकमेव मुद्दा आहे अशी बाजू ठाकरे गटाच्या वकिलांनी कोर्टात मांडली आहे. त्यात अपात्रतेचा मुद्दा विधी मंडळाचा आहे. आयोगाला राजकीय पक्षाबाबत निर्णय घ्यायचा आहे, असे कोर्टाने म्हटले आहे.

अपात्रतेबाबत निर्णय अत्यंत गरजेचा : कपिल सिब्बल
कपिल सिब्बल म्हणाले की, फुटीर गटानं बाजूला होऊन अशापद्धतीने कोणतंही सरकार उलथवता येईल. त्यामुळे सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय होणे गरजेचे आहे. 29 जूननंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. सध्या विधानसभा अध्यक्ष त्यांचेच असल्याने ते निर्णय कसा घेतील? चिन्हाबाबत निर्णय गटाला मान्यता देऊ शकत नाही. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाने व्हिप धुडकावत भाजपाला मतदान केले. हा सगळा घटनाक्रम 29 जूननंतरचा आहे. 29 जूनला सुप्रीम कोर्टानं अपात्रतेवर स्थगिती दिली होती, असे त्यांनी म्हटले तर त्यावर राजकीय पक्षाची व्याख्या कुठल्याही घटनेत उल्लेख मिळत नाही. शिंदे गट विधीमंडळ पक्षाचे सदस्य की राजकीय पक्षाचे सदस्य म्हणून कोणत्या भूमिकेतून आयोगाकडे गेले? अशी टीप्पणी कोर्टाने केली.

इतर पक्षात विलीन व्हावे लागते
शिंदे गटाला कारवाईपासून वाचायचं असेल तर त्यांना इतर पक्षात विलीन व्हावं लागेल परंतु कागदोपत्री त्यांनी विलीनी करणाबाबत शिंदे गटाने निर्णय घेतला नाही. त्यामुळे दहाव्या सूचीनुसार त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हायला हवी. दोन तृतीयांश गट फुटला तरी त्यांना स्वतंत्र अस्तित्व ठेवता येत नाही. त्यांना इतर पक्षात विलीन व्हावे लागते असा युक्तिवाद वारंवार ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात मांडला. तर बहुमत आमच्या बाजूने आहे. इतक्या मोठ्या संख्येने आम्हाला पाठिंबा मिळत आहे त्यामुळे मूळ पक्ष आमचाच आहे, असा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी यावेळी केला.

 


कॉपी करू नका.