PIF-related suspect in Jalgaon’s anti-terrorist squad’s net जळगावच्या दशहतविरोधी पथकाने पीआयएफशी संबंधित संशयीताला अक्सानगरात पकडले


जळगाव : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधितांविरोधात मंगळवारी महाराष्ट्रात छापेमारी सुरू असतानाच जळगावातून एकाला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. उनैस उमर खय्याम पटेल (31, रा.अक्सा नगर, जळगाव), असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. पटेलविरुद्ध सीआरपीसी 151 (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव दहशतवाद विरोधी शाखा, एमआयडीसी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या यांच्या संयुक्त पथकाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेशी संबंधित उनैस उमर खय्याम पटेल (31, रा.अक्सा नगर, जळगाव) याला मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता त्याच्या घरातून ताब्यात घेतले तर पटेलसोबत शहाद्याचा एक तरुण होता मात्र चौकशीअंती त्याला सोडून देण्यात आले. पटेल याला सीआरपीसी 151 (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करून अटक करत कोर्टात हजर करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली.

जळगावातील दोघांवर आतापर्यंत कारवाई
गुरुवार, 22 सप्टेंबर रोजी दहशतवादी विरोधी पथकाने मेहरुणमधील दत्त नगरातील एका धार्मिकस्थळावर छापा टाकून अब्दुल हद्दी अब्दुल रौफ (32, रा.रमहेमान गंज, जालना) याला ताब्यात घेतले होते. अब्दुल हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेचा महाराष्ट्रातील खजिनदार तसेच जालना जिल्ह्याचा सोशल मिडिया प्रमुख होता. दरम्यान, आता पटेल याला पहाटेच ताब्यात घेण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा शहरात खळबळ उडाली असून आतापर्यंत या प्रकरणात जळगावातून दोघांवर कारवाई झाली आहे.


कॉपी करू नका.