32,000 Bribe : Rawer Weighing Inspector Caught In Jalgaon ACB’s Net 32 हजारांची लाच भोवली : रावेरातील वजनमापे निरीक्षक जळगाव एसीबीच्या जाळ्यात


32,000 bribe: Raver Weighing Inspector Caught in Jalgaon ACB’s Net  रावेर : रावेर शहरातील वजनमापे निरीक्षकांना 32 हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुनील रामदास खैरनार (56, रा.एमआयटी कॉलेजजवळ, मुक्ताईनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एस.एस.बिंबे अ‍ॅण्ड सन्स पेट्रोल पंपावर हा सापळा यशस्वी करण्यात आला.

असे आहे नेमके प्रकरण
रावेर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर भुसावळातील तक्रारदाराचा एस.एस.बिंबे अ‍ॅण्ड सन्स पेट्रोल पंप असून त्यांनी तो 11 महिन्यांच्या कराराने चालवण्यास घेतला आहे. पंपावरील चार नोझल मशीन्स स्टॅपींग करून प्रमाणपत्र देण्यासह कुठलीही अडचण येवू न देण्यासाठी आरोपी तथा रावेर वजनमापे निरीक्षक सुनील खैरनार यांनी शासकीय फी व्यतिरीक्त 32 हजारांची लाच मागितली मात्र तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली. खैरनार हे मंगळवारी पंपावर लाच रक्कम घेण्यासाठी आल्यानंतर पंचांसमक्ष त्यांना अटक करण्यात आली.






यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक जनार्धन चौधरी, नाईक किशोर महाजन, नाईक बाळू मराठे, नाईक सुनील वानखेडे, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, कॉन्स्टेबल सचिन चाटे, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !